Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

२६ जानेवारी रोजी अवभृथस्नानाने महायज्ञाची सांगता...

२६ जानेवारी रोजी अवभृथस्नानाने महायज्ञाची सांगता...
 {यज्ञ स्थळाला अमेरिकेच्या श्रीमती लॉरेन यांची भेट* }
नाझरे/प्रतिनिधी:

श्रीक्षेत्र नाझरे येथील महा सोमयाग यज्ञामध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या नामांकित विद्यापीठाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती लॉरेन यांनी महायज्ञ अभ्यासासाठी व जिज्ञासेपोटी मुद्दाम भेट दिली. भारत हे माझे दुसरे घर आहे असे वाटते.हजारो वर्षापूर्वींचे हे वैदिक ज्ञान पाहून मी अनेक वेळा विस्मित होते असे विचार त्यांनी व्यक्त केले.सनातन भारतीय संस्कृती ,भारतीयांचा शिष्टाचार आणि सगळ्या धर्मीयांना, पंथांना सामावून घेणारी भारतीय संस्कृती याचा माझ्या जीवनावर खूप प्रभाव आहे. इसवी सन 2003 पासून त्यांनी भारतात राहून भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृती याचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यात त्यांनी पीएचडी देखील प्राप्त केलेली आहे. परमादरणीय सेलुकर महाराजांच्या अनेक सोमयागाना मी भेट दिलेली आहे. त्यांच्या सारख्या सतपुरुषांनी ही प्राचीन यज्ञ परंपरा सांभाळल्याचा मला नेहमी अभिमान वाटतो असे प्रशंसोद्गागार त्यांनी काढले.
महासोमयाग यज्ञाची समाप्ती दि.२६ जानेवारी रोजी अवभृथ स्नानाने होणार आहे. अवभृथ स्नानासाठी सकाळी ८:३० वाजता यजमान श्री.सेलूकर महाराज,यज्ञाचे सर्व ऋत्विज व सर्व भाविक मिळून नाझरे येथून अंदाजे १३किमी. दूर असलेल्या बुद्धेहळ या तलावास जातील. त्यानंतर परत आल्यावर यज्ञ भूमीमध्ये उदयिनि इष्टी व अग्नि समारोप होऊन या यज्ञाचे अनुष्ठान पूर्ण होईल. दुपारी 1.00 वाजल्या पासून महाप्रसाद सुरू होईल तरी सर्व भाविकांनी या दुर्मिळ व अपूर्व संधीचा लाभ घ्यावा असे यज्ञसेवा समितीने आवाहन केले आहे.

No comments