Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

अयोध्या येथील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर वाटंबरे येथे ग्राम स्वच्छता मोहीम .}

 वाटंबरे येथे ग्राम स्वच्छता.





{अयोध्या येथील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर वाटंबरे येथे ग्राम  स्वच्छता मोहीम .}


अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची २२ जानेवारी सोमवारी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणावर मंदीर, गावातुन स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर सांगोला तालुका वाटंबरे या  ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाचे दिंडीच्या माध्यमातून मंगलमय वातावरणात पूजन करून त्याचे पूर्ण वाटंबरे गावांमध्ये वाटप करण्यात आले आहे.


शनिवारी २० जानेवारी रोजी वाटंबरे गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेमध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला त्यांनी एसटी स्टँड चौक परिसर तसेच खंडोबा मंदिर दत्त मंदिर आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता केली . यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह जाणवत होता.

No comments