वाटंबरे येथे निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक.
वाटंबरे येथे निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक.
वाटंबरे /प्रतिनिधी: केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणूक आयोगाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी प्रात्यक्षिक सादर करून मतदान यंत्र सुरक्षित असल्या विषयीयाचा गावोगावी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे . या पार्श्वभूमीवर शनिवार दि. २० जानेवारी वाटंबरे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक सादर करून दावण्यात आले. यावेळी निवडणूक प्रशिक्षण अधिकारी विशाल हजारे यांनी ईव्हीएम मशीन बद्दल माहिती देत सर्वसामान्य नागरिकांना मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविले, तसेच व्हीव्ही पॅटद्वारे त्याची नोंद योग्य प्रकार झाले का याची पडताळणी कशी करावी ते सांगितले .
या कार्यक्रमास सरपंच किरण पवार, मा. ग्रामपंचायत सदस्य सुब्रावबापू पवार ,मा.सरपंच सुर्यकांत पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य धनंजय पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू मुरलीधर पवार, मा.तंटामुक्ती अध्यक्ष प्रतीक पवार, हनमंत निकम, सुभाष पाटोळे, ईकबाल पटेल आलदर,निवडणूक प्रशिक्षण अधिकारी वैभव जगताप, गाव कामगार तलाठी शिंदे, पोलीस हवालदार विशाल लेंडवे , पोलीस पाटील पांडुरंग पवार, पत्रकार दत्तात्रय पवार तसेच मोठ्या प्रमाणावर वाटंबरे नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

No comments