Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

अजनाळे येथे सीसीटीव्हीचा लोकार्पण सोहळा उद्घाटन.

 अजनाळे येथे सीसीटीव्हीचा लोकार्पण सोहळा उद्घाटन.



 अजनाळे /प्रतिनिधी : ग्रामपंचायतीने अन्य उपक्रमाला पैसे न खर्च करता चांगल्या कामासाठी पैशाचा वापर केला आहे निश्चितच यामुळे या गावातील छोट्या-मोठे  गुन्हे उघड होण्यास मदत होणार आहे. अजनाळे ग्रामपंचायतीने हा राबवलेला स्तुत्य व  नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे. गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणारे सांगोला तालुक्यातील अजनाळे पहिले गाव असल्याचे मत कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.



 काल बुधवार दि १३ सप्टेंबर रोजी अजनाळे  ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगामधुन  बसवण्यात आलेल्या सि.सि टिव्ही  कॅमेऱ्याच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी आपले विचार व्यक्त करत होते. या कार्यक्रमात प्रसंगी सरपंच सुजाताई देशमुख,उपसरपंच अर्जुन येलपले, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय दादा येलपले, उद्योगपती विष्णू देशमुख,पोलिस हवालदार आप्पासो पवार, चंद्रकांत कोळवले, चंद्रकांत चंदनशिवे, महादेव भंडगे, चंद्रकांत पवार, अनिता पवार, हेमंत चव्हाण, धर्मराज शेंबडे, तंटामुक्ती अध्यक्ष शरद येलपले, पोलीस पाटील संतोष भंडगे, डॉ अशोक कलाल, ग्रामसेवक संदीप सरगर, बापू कोळवले, प्रल्हाद येलपले,अनिल लाडे,अमित शेंबडे यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.


 पुढे बोलताना पो. नि कुलकर्णी म्हणाले की, या  ग्रामपंचायतीने राबवलेला उपक्रम तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने राबवावा या सि.सि टिव्ही कँमेरामुळे मागील दोन - तिन महिन्यात गंभीर गुन्हे उघडकिस आले आहेत.परिनामी गुन्हेगारीवर आळा बसवण्यास पोलीस प्रशासनास मदत होत आहे.

या मुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारावर दबाव निर्माण होत असून त्यामुळे छोटे मोठे प्रकारांना चाप बसणार आहे. सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी मिळून घेतलेला हा निर्णय गावासाठी निश्चितच फायदा देणारा ठरणार आहे त्यामुळे गावातील गुन्हेगारीवर नियंत्रण राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डाँ अशोक कलाल यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.


💥
जाहिरात;






No comments