वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने तालुक्यातील पत्रकारांची मोफत सर्वरोग निदान शिबीरात तपासणी
वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने तालुक्यातील पत्रकारांची मोफत सर्वरोग निदान शिबीरात तपासणी
सांगोला/प्रतिनिधी ः
सांगोला शहर व तालुक्यातील पत्रकार अहोरात्र जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतात ते स्वतःची कधीही काळजी घेत नाहीत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पत्रकारांची 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने तालुक्यातील सर्व पत्रकारांची मोफत सर्वरोग निदान शिबीरात आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील व शहरातील पत्रकारांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद नोंदविला.
वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये पत्रकारांची बी.पी (ब्लड प्रेशर,) रक्तातील साखर, सोनोग्राफी, एक्स रे यासह सर्व तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या. यावेळी वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर व सर्व स्टाफ तसेच तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गोर-गरीब रूग्णांसाठी महात्मा ज्योतिराव फुले, जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना या योजना असल्यामुळे या योजनेमध्ये मोठमोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, तज्ञ डॉक्टरांकडून व सुपर स्पेशालिटी सर्जन यांच्याकडून करण्यात येत आहेत. या वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयु), एनआयसीयु, पीआयसीयु, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सुसज्ज प्रसुती विभाग, स्वतंत्र ओपीडी, व्हेन्टीलेटर्स, डिजीटल एक्स-रे, अद्यावत सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, इ.सी.सी., सी.ऑर्म, सिरीज पंप, तज्ञ डॉक्टरांच्या भेटी, 24 तास मेडिकल, 24 तास लॅबोरेटरी, अॅम्बुलन्सची सुविधा , सोनोग्राफी, अपेंडिक्स, अल्सर, हर्निया व हायड्रोसील, उच्चरक्तदाब, कॅन्सर रोग निदान व सल्ला, मुत्रविकार, मुतखड्यावर निदान व उपचार * न्युरोसर्जरी, युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, किडनीचे विकार, टॉन्सिल, नाकातील हाड काढणे, मुळव्याध इंजेक्शन व शस्त्रक्रिया,, प्रसुती, बिनटाका गर्भाशय पिशवी काढणे, सिझेरीयन, गर्भ पिशवी काढणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भाशयाची पिशवी साफ करणे, 1) कमी दिवसाचे बाळ 2) कावीळ वाढली असल्यास 3) बाळाला सतत झटके येत असल्यास 4) न्युमोनिया 5) लहान बालकांच्या ऑपरेशन ची सोय 6) जन्मा नंतर लहान बाळ रडले नसल्यास उपचार तसेच मूत्ररोग, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार, किडनीचे आजार, किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे, मूत्राशयातील खडे, मूत्रमार्गातील खडे अन्य मूत्रविकार या सर्व आजारांवर मोफत निदान व मोफत शस्त्रक्रियाया सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तरी सांंगोला शहर व तालुक्यातील गोरगरीब रूग्णांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.




No comments