उपविभागीय कृषी अधिकारी यांची यशराज गांडूळ खत प्रकल्पास भेट.
उपविभागीय कृषी अधिकारी यांची यशराज गांडूळ खत प्रकल्पास भेट.
सांगोल तालुका वाटंबरे येथील युवा उद्योजक सुरेश पवार यांच्या यशराज गांडूळ खत प्रकल्पास पंढरपूर येथील उपविभागीय कृषी अधिकारी लांडगे यांनी भेट दिली.
त्यांनी अल्पावधीत शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या उच्च प्रतीचा गांडूळ खत व वर्मी वॉशची पाहणी करत सुरेश पवार यांचे कौतुक केले .
नाशिक येथील ऍग्रो अ कृषि मंचच्या वतीने वसंतराव नाईक आदर्श कृषी प्रेरणा पुरस्काराने सुरेश पवार यांना आताच सन्मानित करण्यात आलेले असल्याने उप विभागीय कृषी अधिकारी लांडगे यांनी यावेळी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत कृषी पर्यवेक्षक श्रीधर शेजवळ ,कषी सहाय्यक उत्कर्ष चंदनशिवे, दत्तात्रय खरात व बाळासाहेब सावंत उपस्थित होते .
यावेळी वाटंबरे येथील शरद पवार व अर्जुन पवार उपस्थित होते .




No comments