वाटंबरेचे सुरेश पवार यांना कृषी प्रेरणा पुरस्कार.
वाटंबरेचे सुरेश पवार यांना कृषी प्रेरणा पुरस्कार.
नाशिक येथील ऍग्रो केअर कृषी मंचाच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक आदर्श कृषी प्रेरणा पुरस्कार वाटंबरे येथील कृषी उद्योजक सुरेश पवार यांना सिने अभिनेते दीपक शिर्के ,कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कृषी दिनानिमित्त पंचवटी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद रसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरेश पवार यांनी वाटंबरे येथे यशराज गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून सेंद्रिय खताचा व्यवसाय चालू केला. त्यांनी अल्पभूधारक शेतकरी ते गांडूळ खत उत्पादक असा कमी कालावधीमध्ये यशस्वी प्रवास केला त्यांनी यशराज गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी तसेच विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी बनवलेल्या गांडूळ खतला व वर्मी वॉशला महाराष्ट्र, कर्नाटक ,मध्य प्रदेश येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यांना पंढरपूर येथे आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. याशिवाय त्यांचा सामाजिक कार्यातही मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन नाशिक येथील ॲग्रो केअर कृषी मंचाच्या वतीने राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार स्विकारते वेळी सांगोला येथील शरद पवार, धनाजी पवार, धीरज पवार ,संतोष पाटील या वेळी उपस्थित होते.


No comments