Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सांगोल तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर

 

{नूतन कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर सर्व पदाधिकारी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना}

सांगोला - सांगोला तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी पुढारीचे तालुका प्रतिनिधी भारत कदम, उपाध्यक्ष पदी दै. एकमतचे तालुका प्रतिनिधी विकास गंगणे, सचिव पदी लोकमतचे तालुका प्रतिनिधी अरुण लिगाडे ,सहसचिव पदी दै तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर, खजिनदार पदी धाडसचे संपादक रोहीत सुर्यगंध यांची बिनविरोध निवड झाली.

नुतन अध्यक्ष : भारत कदम


निवडीनंतर नुतन पदाधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.सांगोला तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी निवडीची बैठक काल शुक्रवारी  संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सचिन भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीस संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक सोलापूरी मशाल संपादक हमिदभाई इनामदार, जेष्ठ पत्रकार लोकसत्ता, संचार तालुका प्रतिनिधी एम एम पठाण , सांगोला संपदा संपादक नागेश जोशी , सुराज्य चे तालुका प्रतिनिधी निसार तांबोळी, सांगोला पंचनामा संपादक सुरज लवटे,  बहुजन क्रांतीचे संपादक हमीद बागवान, विचार महाराष्ट्रचे संपादक सुरेश गंभीरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.



या बैठकीत वरील प्रमाणे सर्वानुमते नूतन पदाधिकारी, कार्यकारणीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. यावेळी निसार तांबोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.



सचिव :अरूण लिगाडे




No comments