वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर पंधरवडा*
सांगोला येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी मोफत शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व उपचार करून अल्पावधीतच रुग्णांच्या पसंतीस उतरलेले सांगोला एसटी स्टँड समोरील प्रसिद्ध वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत उपचार शस्त्रक्रिया शिबीर पंधरवडा दि. ५ जुलै ते २० जुलै २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुप्रसिद्ध डॉ. चेतन शहा {मूत्र रोग तज्ञ} यांच्या सहकार्याने मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर आयोजित केले गेले आहे.
सदरच्या शिबिरामध्ये मूत्ररोग, मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार,किडनीचे आजार,किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयातील खडे,लघवी संबंधितील आजार इ. आजारांवर तपासण्या केल्या जाणार आहेत.या शिबिरासाठी जुने रिपोर्ट व फाईल्स घेऊन यावे व मोफत उपचार शस्त्रक्रिया शिबिराचा सर्व गोर गरीब गरजु रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.अण्णासो लवटे व फिजिशियन डॉ. निरंजन केदार यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. तसेच गरजूंनी खलील फोनवरती संपर्क करण्याचे आवाहन केले आहे .संपर्क- 8484069005,9145124579





No comments