स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी मोर्चा काढू- राज्य संघटना सरचिटणीस विकास सूर्यवंशी*
*स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी मोर्चा काढू- राज्य संघटना सरचिटणीस विकास सूर्यवंशी*
*{वृत्तपत्र विक्रेता संघटनांचा निर्धार ; पश्चिम महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक सांगली येथेसंपन्न}*
नाझरे प्रतिनिधी
वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील सर्व घटकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळच करावे शासनाने ही मागणी पूर्ण करावे यासाठी राज्यभर होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेत चालू पावसाळी अधिवेशनात निर्णय घेतला नाही तर कामगार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढायचा निर्धार पश्चिम महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला
राजे संघटनेचे सल्लागार शिव गोंडा खोत यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य संघटना सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थित सांगली कोल्हापूर सोलापूर व सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली बैठकीस संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे संघटन सचिव श्याम थोरात माजी कोषाध्यक्ष गोरख भिलारे राज्य कार्यकारणी सदस्य अण्णा गुंडे राजेंद्र माळी गणेश पवार सातारा हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते स्वागत राज्य कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे यांनी केले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ ग्रामीण भागातील एजंट विक्रेत्यांच्या प्रश्नांसाठी शहरातील विक्रेते सोबत असून सर्वांनी एकत्रितपणे लढा तीव्र करण्यासाठी शिव गोंडा खोत म्हणाले वृत्तपत्र विक्रेत्यांनी स्वतंत्र कल्याणकारी मंडळच हवे यासाठी संघटन अधिक मजबूत करून आंदोलन करायचे आहे विकास सूर्यवंशी म्हणाले राज्य संघटना गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत आहे कामगार मंत्री एका बाजूला स्वतंत्र मंडळ कोणाचे होणार नाही असे आम्हाला सांगतात रघुनाथ कांबळे म्हणाले रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही असे गोरख भिलारे यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी कार्यकारिणीचे सदस्य अण्णा गुंडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुते मारुती नवलाई सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवलिंग आप्पा मेढेकर उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे अरुण कोरे सोलापूर जिल्हा सचिव सचिन बाबर सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष उत्तम काका चौगुले सांगोला तालुका अध्यक्ष रविराज शेटे पोपट घोरपडे चंद्रकांत जोशी शिवाजी जाधव लक्ष्मण सावंत परशुराम सावंत अंकुश परब सुरेश ब्रह्मपुरे आसिफ मुलानी सौरभ रवींद्र लाड रणजीत आयरेकर समीर कवठेकर इंद्रजीत पवार नागेश गायकवाड धनंजय सावंतवाडी प्रशांत जगताप मिरज भास्कर मोरे विकास क्षीरसागर ताजुद्दीन आगा गिरीश वैद्य कराड दत्तात्रय सरगर विशाल रासकर सचिन माळा भास्कर भोरे धनंजय राजहंस तानाजी जाधव युवराज पाटील सागर घोरपडे अमोल साबळे दीपक वाघमारे नागेश कोरे प्रशांत साळुंखे बाळासाहेब मोरे श्रीकांत दुधाळ बजरंग यमगर सुरेश गायकवाड बंदेनवाज मुल्ला बाळू पाटील समित मेहता उपस्थित होते.
*______________________*
बैठकीत ठराव
- वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील सर्व घटकासाठी हवे स्वतंत्र मंडळ
-पश्चिम महाराष्ट्रात करणार तीव्र आंदोलन
-मंत्री आमदार खासदार व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडे वृत्तपत्र पुरवठा थांबवू
-शासकीय जाहिरातींचे अंक वितरण थांबवू
*________________________*


No comments