अनावश्यक खर्चाला फाटा देत पोपट यादव यांच्याकडून राधेश्याम वृद्धाश्रमास फॅन व खाऊ भेट.
अनावश्यक खर्चाला फाटा देत पोपट यादव यांच्याकडून राधेश्याम वृद्धाश्रमास फॅन व खाऊ भेट.
सांगोला प्रतिनिधी/ दशरथ बाबर :चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बलवडी ,वझरे येथील राधेश्याम वृद्धाश्रमास टेबल फॅन भेट देऊन व वृद्धांसाठी खाऊ वाटप करून आपला वाढदिवस मित्रपरिवारासह साजरा केला .जनसामान्याविषयी आपुलकी असणारे व सामाजिक बांधिलकी जोपासणारे जाणीव ग्रुपचे सर्वेसर्वा व चोपडी गावचे युवा उपसरपंच पोपट यादव हे नेहमीच सामाजिक कार्यासाठी सतत पुढे असतात. चोपडी ग्रामस्थ ,विविध संस्थांचे पदाधिकारी, मित्रपरिवार, नातेवाईक यांनी पोपट यादव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला .
राधेश्याम वृद्धाश्रमातील वृद्धांची विचारपूस करून माहिती घेतली. बलवडी= वझरे येथील वृद्धाश्रमात भेटीवेळी पोपट यादव, ग्रामपंचायत सदस्य दिनेश बाबर ,संतोष यादव ,प्रकाश गिड्डे ,विलास बाबर, बंडू मेखले, सिद्धनाथ गुरव ,पत्रकार दशरथ बाबर वृद्धाश्रमाचे सचिव अनिल गायकवाड, अंजना गायकवाड आदी उपस्थित होते . तसेच उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.




No comments