Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

समर्थ सद्गुरू संजीवा स्वामी महाराज यांची पुण्यतिथी संपन्न.

 समर्थ सद्गुरू संजीवा स्वामी महाराज यांची पुण्यतिथी संपन्न.



नाझरे प्रतिनिधी

         . वेचारे जन्म मोक्षासाठी! जगावे सारी कीर्ती साठी! आम्ही सर्व खुशी तरी! देव आपुले नाही दूरी!! भजनी रंगी सदा रंगू या! ब्रह्मानंद मनी भरूया संजीवा म्हणे गुरुचरणी! ध्यान धरावे निशीदिनी!! साधुसंत दिसे भिन्नभिन्न! परी ते एकची परीपूर्ण! म्हणे संजीवा जळी स्थळी निजरूप तुझे!!

         साधुसंत जरी वेगवेगळे दिसत असले तरी ते सर्व एकच योगी आहेत व जळी स्थळी संजीव स्वामी महाराज आहेत व त्यांचे ध्यान करण्यासाठी सर्व भक्तांनी मनोभावे सेवा करावी म्हणजे ब्रह्मानंद मनी भेटेल असे ह भ प सुखदेव आदाटे महाराज यांनी श्री दत्त मंदिर नाझरे वझरे येथे समर्थ सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुलाच्या कीर्तनाप्रसंगी सांगितले.


           दुपारी बारा वाजता समर्थ सद्गुरु संजीवा स्वामी महाराज यांची फुले पडली त्यानंतर दिंडी प्रदक्षिणा महाप्रसाद वाटप गोमाता पूजन व नाझरे गावातून समर्थांच्या पालखीची मिरवणूक संजीवा लेझीम मंडळ यांच्या मनमोहक नाच गाण्यासह तसेच अनेक दिंडीच्या समवेत संपन्न झाली यावेळी नाझरे व परिसरातील अनेक संजीवाभक्त व संजीव आश्रम मधील सर्व भक्तगण ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


No comments