Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे वाटंबरे येथे कॅम्पचे आयोजन.


लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे वाटंबरे येथे कॅम्पचे आयोजन. 
लाईफ लाईन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे वाटंबरे येथील खंडोबा देवस्थान येथे कॅम्पचे आयोजन केले गेले होते. यावेळी कॅम्पमध्ये उपस्थित असणाऱ्या नागरिकांना हॉस्पिटलच्या वतीने कमी दरामध्ये असणाऱ्या लाईफ लाईन फॅमिली हेल्थ कार्ड चे वाटप करण्यात आले .
 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ,पोलीस कुटुंब आरोग्य योजना, विविध आरोग्य विमा योजना, राज्य कामगार विमा योजना या सर्व शासकीय उपलब्ध योजनेबरोबर जे आजार कोणत्याही योजनेत बसत नाहीत अशा सर्व आजारावर हॉस्पिटलमध्ये तपासण्या व उपचार सवलतीच्या दरात केले जाणार आहेत अशा रुग्णांना मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी, साईबाबा संस्थान शिर्डी ट्रस्ट कडून आर्थिक मदत मिळून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, विना खर्च मेडिक्लेम धारकासाठी इन्शुरन्स कंपनी या सर्व योजनेचा लाभ फॅमिली कार्डधारकांना मिळणार आहे तसेच एका कार्डावर कुटुंबातील सर्व सदस्यांना याचा लाभ घेता येणार आहे अशी माहिती लाईफ लाईन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे कर्मचारी रेश्मा सुरवसे यांनी दिली .
हा कॅम्प वाटंबरे येथे अजून पाच दिवस चालणार आहे तरी वाटंबरे येथील नागरिकांना लाईफ लाईन फॅमिली हेल्थ कार्ड काढण्याचे यावेळी त्यांनी आव्हान केले.
या कॅम्पला आशा वर्कर संगीता गेजगे, दिपाली पवार, विद्या पवार व वाटंबरे नागरिक उपस्थित होते.

No comments