Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे ग्रा.पं. कडून नारीशक्तीचा सन्मान.

 वाटंबरे ग्रा.पं. कडून नारीशक्तीचा सन्मान.



‌  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून सुरू केलेल्या महिला सन्मान पुरस्कार ग्रामपंचायत वाटंबरे यांच्याकडून वितरित करण्यात आला.

या पुरस्कारासाठी ग्रामपंचायत यांच्याकडे द्रोपदी भगत, वैशाली पवार , अस्मिता धनवडे, सुरेखा धनवडे, या चार महिलांचे प्रस्ताव आले होते यावेळी ग्रामपंचायत वाटंबरे यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी दोन महिलांना पुरस्कार न देता या चारही महिलांची विविध क्षेत्रातील कामगिरी पाहून ग्रामपंचायत उपसरपंच मोनिका निकम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह ,प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केले.

यावेळी वाटंबरे  गावचे पोस्टमास्तर भाऊसाहेब रामचंद्र पवार हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचाही सत्कार यावेळी वाटंबरे ग्रामपंचायत सरपंच किरण पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्राम विकास अधिकारी शंकर मेटकरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य सेविका कर्मचारी, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


चौकट:

{या वर्षीच्या पुरस्कारासाठी गावातुन चार महिलांचा प्रस्ताव आल्याने चारही  महिलांची सामाजिक क्षेत्रातील कार्य पाहून चारही महिलांना पुरस्कार देण्यात आले. तरी गावातील इतर महिलांनी जास्तीत जास्त सामाजिक क्षेत्रामध्ये सहभाग नोंदवावा.


ग्रामविकास अधिकारी शंकर मेटकरी.}



No comments