Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

उदनवाडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती आनंदमय व उत्साही वातावरणात साजरी

 उदनवाडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती आनंदमय व उत्साही वातावरणात साजरी.



पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ उदनवाडी या मंडळाच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती साजरी करण्यात आली. दिनांक 31 मे 2023 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  सायंकाळी मायाक्का देवी ओविकार मंडळ उदनवाडी या ओविकार मंडळाचा जंगी असा ओवीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर संध्याकाळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची उदनवाडी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीने  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298व्या जयंती ची सांगता झाली.

ही जयंती साजरी करण्यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ उदनवाडी या मंडळातील सर्व सदस्यांचे, तसेच उदनवाडी ,काळामळा,

 शिंगाडेमळा , वतवस्ती, मारकडमळा, कारंडेवाडी, झापाचीवाडी येथील सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments