Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

उदनवाडी येथील विकास वलेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती .

  उदनवाडी येथील विकास वलेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती .



उदनवाडी तालुका सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते व गेल्या सात ते आठ वर्षापासून जनसेवेचा वसा घेतलेले सामाजिक कार्यकर्ते मा. विकास दत्तात्रय वलेकर सर यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचा युवा व अभ्यासू चेहरा सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा चेहरा म्हणून विकास वलेकर यांची ओळख आहे. ते गेल्या सात वर्षापासून निष्ठेने सांगोला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत.

गेल्या कित्येक वर्षापासून अपंग पेन्शन योजना, पी एम किसान योजना, विधवा पेन्शन योजना, उज्वला गॅस योजना, शेतकऱ्यांसाठी विविध कृषी विषयक योजना, तसेच विविध गावातील सार्वजनिक कामे, सर्व गावातील गोरगरीब  घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम करत आहेत त्याचेच फळ त्यांना मिळाले आहे.

मा. विकास वलेकर हे गावातील तसेच आसपासच्या सर्व धार्मिक सामाजिक व राजकीय कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होत असतात. गोरगरिबांसाठी सतत झटतात व समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करत असतात गावातील लहानापासून थोरापर्यंत सर्वांना मान देतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली ते संधीचे सोने करतील असे जनतेतून बोलले जात आहे. तसेच मा. विकास वलेकर सर यांनी सांगितले की आगामी काळात सांगोला तालुक्यात पंचायतराज व ग्रामविकास विभाग कार्यकारणी नेमून त्या मार्फत केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना सांगोला तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून सर्वांना न्याय दिला जाईल. प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक कामावरही भर दिला जाईल. माणुसकी हा सर्वात मोठा पक्ष आहे. व प्रत्येक माणूस त्याचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे  प्रत्येक गावातील सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. आपल्या एका जनसामान्यांसाठी कार्य करणारा व धडपडणारा सर्वसामान्य युवक मा. विकास वलेकर सर यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने त्यांना एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे व ते संधीचे सोने करतील असे जनतेतून बोलले जात आहे.



No comments