*चोपडी गावच्या वर्ग मित्राचा अठरा वर्षांनी भरला स्नेह मेळावा*
नाझरे प्रतिनिधी
चोपडी तालुका सांगोला येथील दहावी 2005 च्या बॅचचेवर्गमित्राचा अठरा वर्षांनी भरलास्नेह मेळावा यामध्ये एकमेकांशी संवाद साधत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला व चोपडी येथील हायस्कूलचे गुरुजन शिक्षक व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची अनोखी भेट झाल्याने सर्वजण भारावून गेले व प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हास्य आनंद दिसत होता हा स्नेह मेळावा बु ध्ये हाळबंगल्यावर पार पडला
बऱ्याच वर्षानंतर भेट झाल्याने यामधील अनेक जण उच्च पदावर कार्यरत आहेत व अठरा वर्षानंतर झालेली ही भेट सर्वांच्या आयुष्यातील सुवर्णमय भेट असल्याचे सर्वजण सांगत होते यामध्येसंवाद साधत प्रत्येक जण आपण लहानपणी कसे होतो शाळेत असताना खोड्या व अभ्यास कसा केला यशस्वी कसे झालो याचा इतिहास सांगत होते असा हा मेळावा यापुढेही व्हावा व एकमेकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन यामधून मार्ग काढावा असे सर्वांमध्ये ठरले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा