Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, २२ मे, २०२३

भूगोलातील विद्यार्थ्यांना जिओ इन्फॉर्मेटिक्स ही भविष्यातील नोकरीसाठी सुवर्ण संधी.

 भूगोलातील विद्यार्थ्यांना जिओ इन्फॉर्मेटिक्स ही भविष्यातील नोकरीसाठी सुवर्ण संधी.



सांगोला महाविद्यालयात आज भूगोल विभागात ग्रॅज्युएशन नंतर भूगोल विषयातील नोकरीच्या संधी या विषयावर प्रा. डॉ. अमोल पवार सांगोला महाविद्यालय सांगोला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व अध्यक्ष म्हणून प्रा. संतोष कांबळे भूगोल विभागप्रमुख हे उपस्थितीत होते. 2023 चे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढे काय करावे या संदर्भात भूगोल विभागामध्ये नोकरीच्या संधी या विषयावर डॉ. अमोल पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कशी प्रोसेस असते त्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. 


महाराष्ट्रातील तसेच भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठातील व खाजगी इन्स्टिट्यूट मधील प्रवेश पूर्व परीक्षा बाबतीत तसेच तेथील कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी काय करावे त्याचबरोबर तेथील अभ्यासक्रम, कोर्सचा कालावधी तसेच नोकरीच्या संधी काय व कशा असतात याची माहिती विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर प्रेझेंटेशन द्वारे करून दिली. नॅशनल व मल्टिनॅशनल कंपनीमध्ये भूगोलातील विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी मिळतात. त्याचबरोबर कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांचे प्रमोशन कसे कसे होत जाते यासंदर्भात सविस्तर माहिती देऊन शासनाच्या कोणत्या विभागांमध्ये भूगोल विषयातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळू शकतात त्याची ही माहिती दिली. आत्तापर्यंत भूगोल विभागातील माझी विद्यार्थी जिओ इन्फर्मेटिक्स मध्ये कशाप्रकारे नोकरी करीत आहेत, कोणकोणत्या कंपन्यांमध्ये काम करीत आहेत, त्यांच्या कामाचे स्वरूप कोणत्या प्रकारच्या आहे व त्यांचे पॅकेज कसे आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

प्रमुख पाहुणे प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भूगोल हा विषय किती महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितले. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर भविष्यामध्ये आपणास कोणकोणत्या प्रकारच्या संधी आहेत याचे सविस्तर माहिती सरांनी आपल्या भाषणामध्ये दिली. 

सध्या भारतात तसेच भारताबाहेरील देशांमध्ये पर्यटनाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे सांगताना अध्यक्ष प्रा. संतोष कांबळे यांनी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना पर्यटन घडवून आणले. पर्यटनामध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी त्यांनी अधोरेखित केल्या. भूगोल हा विषय घेऊन विद्यार्थ्यांनी पर्यटनामध्ये नोकरीच्या संधी किती व कशा आहेत हे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी माझी विद्यार्थ्यांचा संदर्भ देत विद्यार्थी कशाप्रकारे पर्यटनामध्ये करिअर करत आहेत याची माहिती दिली.  कशा पद्धतीने पर्यटन गाईड, सहलीचे नियोजन, सहलीचे मॅनेजमेंट यामध्ये करिअरच्या संधी यांची सविस्तर माहिती करून दिली. 


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शंकर पाटील यांनी करून दिले तसेच प्रा. विकास उबाळे यांनी सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाचे आभार प्रा. अनिस बागवान यांनी मांडले. कार्यक्रमास महादेव काशीद यांचे सहकार्य मिळाले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart