Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, ७ मे, २०२३

लेख:,सांगोला तालुक्यातील शैक्षणिक सुवर्णकाळ म्हणजेच: मा. श्री. बाबुरावजी (भाऊं) गायकवाड





 सांगोला तालुक्यातील शैक्षणिक सुवर्णकाळ म्हणजेच: मा. श्री. बाबुरावजी (भाऊं) गायकवाड



वास्तविक पाहता शिक्षणसंस्था किंवा कॉलेजस या समाजाच्या आस्थेचा विषय आहेत. उच्च शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचा  कारखाना असून, यातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी देशाचा व समाजाचा जबाबदार नागरिक म्हणून बाहेर पडला पाहिजे. याची जबाबदारी आपली आहे. हा उदात्त हेतू शिक्षणक्षेत्रात भाऊंनी ठेवला आहे. शिक्षणामुळे समाज जीवनात परिवर्तन घडते त्या दृष्टीने प्रत्येक पाऊल भाऊं शिक्षण क्षेत्रामध्ये टाकत आहेत. म्हणूनच भाऊंच्या कार्याचा गौरव अनेक ठिकाणी मानसन्मानसहित केला जातो.

प्राध्यापकांनी आपली जबाबदारी नेटकेपणाने पार पाडावी यासाठी वेळोवेळी भाऊंनी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधा कॉलेजमध्ये तयार करून दिल्या आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून प्रशासकीय कामकाजामध्ये भाऊ जातीने लक्ष घालतात . याचाच परिणाम असा आहे की आज  कित्येक पालक व विद्यार्थी हे भाऊंच्या या स्वभावामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष जोडलेले आहेत. कॉलेजमध्ये त्यांची सर्वांना आदरयुक्त भीती नेहमी असते.


आज शिक्षणाच्या माध्यमातून भाऊंनी तालुक्यात तसेच तालुक्या बाहेरही कित्येक विद्यार्थी उच्च शिक्षित करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले आहे. भाऊंच्या या  शैक्षणिक संकृतीत वाढलेल्या इथल्या रक्ताच्या माणसांना सर्वाधिक शिक्षक, विद्वान, शेतकरी, सामाजिक परिवर्तन, राजकारणी, समाजसेवक, आर्थिक संपन्न, जबाबदार नागरिक  इ. समर्थ व्यक्ती या शिक्षणव्यवस्थेनेच निर्माण केल्या.

जीवनात बरीच माणसं येता अन जातातपरंतु आपल्यासारखी माणसं मोठय़ा नशिबाने मिळतात तुमचं आयुष्य असंच कणाकणाने वाढत राहो हीच सदिच्छा परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य कायम असेच निरोगी व सुखी राहो..

अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त भाऊना मनापासून  खूप खूप शुभेच्छा!!






प्रा. डॉ. अमोल पवार (सहा. प्राध्यापक)सांगोला महाविद्यालय सांगोला







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart