भाजपच्या "प्रदेश निमंत्रीत सदस्य" पदी सांगोला येथील ॲड. गजानन भाकरे यांची नियुक्ती.
भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच जाहीर केली.या कार्यकरणी मध्ये "प्रदेश निमंत्रीत सदस्य" म्हणून सांगोला येथील माजी नगरसेवक ॲड. गजानन भाकरे यांची वर्णी लागली आहे.ॲड. गजानन भाकरे यांनी भारतीय जनता पार्टी चे सोलापूर जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष पद यशस्वी पणे सांभाळले आहे.त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सामाजिक उपक्रम राबवून तसेच विकास कामांना प्राधान्य देऊन शासन दरबार त्याचा पाठपुरावा करून अनेक विषय मार्गी लावलेले आहेत.
पुढील काळात सक्रिय राजकारणामधून जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहणार आहे .ॲड:गजानन भाकरे
त्यांच्या निवडी बद्दल माजी मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर ,आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी , भाजप जिल्हा पदाधिकारी व सांगोला तालुका पदाधिकारी यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा