Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, ११ मे, २०२३

काल्याचे किर्तनाने वाटंबरे येथील ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहची समाप्ती.

 काल्याचे किर्तनाने वाटंबरे येथील ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहची समाप्ती.




वाटंबरे/प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथे ४ मे गुरुवारपासून  ह .भ .प दादा महाराज शेटफळकर, ह. भ. प. धोंडोपंत दादा महाराज पंढरपूर व ह.भ.दत्तू बुवा  वाटंबरेकर यांच्या कृपाशीर्वादाने  ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह  प्रारंभ झाला होता . यात दररोज काकडा आरती, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन, नामजप, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.


या सप्ताहादरम्यान ४ मे गुरुवारी , ह.भ.प. लक्ष्मण काळे महाराज (पंढरपूर), ५ मे शुक्रवारी ह.भ.प. केशव महाराज नामदास , ६ मे  शनिवारी ह.भ.प.  शंकर बडवे महाराज ,७ मे  रविवारी ह.भ.प. सुप्रियाताई बंडगर ,  ८ मे सोमवारी ह.भ.प. कृष्णा गायकवाड महाराज , ९ मे  मंगळवारी ह.भ.प. प्रदीप ढेरे महाराज, १० मे बुधवार  ह. भ. प. मारुती कचरे महाराज यांच्या सर्वांचा या सप्ताह मध्ये कीर्तन सेवचा वाटंबरे ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक, बालगोपाळ, भाविक भक्तांनी या कीर्तन सेवेचा लाभ घेतला. 

 ्नं्न्नं्नं्न््नं्न्नं्नं््नं््नं्न् ‌


 गुरवार दि ११ मे रोजी सकाळी आठ वाजता वाटंबरे नगरीत दिंडी  प्रदक्षिणा सकाळी दहा वाजता ह. भ. प  मच्छिंद्र जगताप महाराज  यांचे काल्याचे कीर्तन झाले व कीर्तनानंतर महाप्रसादाच्या आयोजन केले गेले होते या महाप्रसादानंतर   ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती झाली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart