वाटंबरे येथे ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात.
वाटंबरे/प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथे ४ मे गुरुवारपासून ह .भ .प दादा महाराज शेटफळकर, ह. भ. प. धोंडोपंत दादा महाराज पंढरपूर व ह.भ.दत्तू बुवा वाटंबरेकर यांच्या कृपाशीर्वादाने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला आहे. यात दररोज काकडा आरती, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन, नामजप, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर, असे विविध कार्यक्रम होत आहेत.
या सप्ताहादरम्यान ४ मे गुरुवारी , ह.भ.प. लक्ष्मण काळे महाराज (पंढरपूर), ५ मे शुक्रवारी ह.भ.प. केशव महाराज नामदास , ६ मे शनिवारी ह.भ.प. शंकर बडवे महाराज ,७ मे रविवारी ह.भ.प. सुप्रियाताई बंडगर , ८ मे सोमवारी ह.भ.प. कृष्णा गायकवाड महाराज , ९ मे मंगळवारी ह.भ.प. प्रदीप ढेरे महाराज, १० मे बुधवार ह. भ. प. मारुती कचरे महाराज यांच्या सर्वांचा या सप्ताह मध्ये कीर्तन सेवचा लाभ मिळणार आहे. गुरुवार दि ११ मे रोजी सकाळी आठ वाजता दिंडी प्रदक्षिणा व सकाळी दहा वाजता काल्याचे किर्तन ह. भ. प मच्छिंद्र जगताप महाराज यांचे कीर्तनसेवाने होणार आहे
तरी वाटंबरे ग्रामस्थ व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी, भाविक भक्तांनी व बालगोपाळाणी या ज्ञानेश्वर पारायण हरिनाम सप्ताह, किर्तन सेवेचा लाभ घेण्याचे आव्हान सप्ताह संचालक ,समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ वाटंबरे यांच्या वतीनेकरण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा