Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

निराधार वृध्दांना आधार देणे हेच उद्दिष्ट -वैशालीताई चाकणकर

 निराधार वृध्दांना आधार देणे हेच उद्दिष्ट -वैशालीताई चाकणकर



सांगोला प्रतिनिधी/ दशरथ बाबर:   राधेश्याम फाउंडेशन संचलित, राधेश्याम वृद्धाश्रम बलवडी -वझरे या ठिकाणी सन २०१९ मध्ये वृद्धाश्रम सुरू करून ग्रामीण भागातील निराधार वृद्धांना आपुलकीचा आश्रय  देण्याचे उद्दिष्ट सार्थकी लावले. जन्मात येऊन  सेवा घडावी. मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून वृद्धाश्रम सुरू केला. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात निराधार वृद्धांना आधार  व मदत देणे लाख मोलाचे असते. सामाजिक कार्याची व सेवेची आवड  त्यासाठी केलेले प्रयत्न यातून समाधान मिळते. भविष्यात या भागामध्ये शैक्षणिक संस्था तसेच वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारी संस्था निर्माण करून शैक्षणिक पाया मजबूत करण्याचा मानस आहे. पुण्यामध्ये हॉस्पिटल तसेच शाळा सुरू करण्याचा विचारही असल्याचे राधेश्याम फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्ष वैशाली चाकणकर यांनी बलवडी येथील राधेश्याम वृद्धाश्रमामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले .


यावेळी या संस्थेचे सचिव अनिल गायकवाड यांनीही राधेश्याम वृद्धाश्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून सध्या या वर्धाश्रमात 11 लोक निवासी आश्रयास असल्याचे त्यांनी सांगितले. वृद्धाश्रमात यापूर्वी फुफूसाचे आजार शिबिर, डोळ्यांच्या आजाराविषयी शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित केले होते. लवकरच  वृद्धाश्रमाचे ठिकाणी रक्तदान शिबिर ही आयोजित करण्याचा विचार यावेळी संस्थेच्या संस्थापिका वैशाली चाकणकर व सचिव अनिल गायकवाड यांनी व्यक्त केला.



    यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांनी या ठिकाणी चांगल्या सेवा सुविधा मिळत असून आम्हाला मायेची सावली देणारी देवरूपी माणसं व माणुसकी मिळाली अशी गोड प्रतिक्रिया  व्यक्त केली.





No comments