उदनवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न .
{भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा सोलापूर जिल्हा चिटणीस मा. विकास वलेकर सर यांचे सामाजिक कार्य आदर्शवत-चेतनसिंह केदार- सावंत .}
चोपडी :प्रतिनिधी :दशरथ बाबर-/उदनवाडी ता. सांगोला येथील भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्हा चिटणीस विकास दत्तात्रय वलेकर सर यांनी आपल्या सामाजिक कार्यातून तळागाळातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजना मिळवून देऊन खऱ्या अर्थाने विकास साधला आहे. विकास वलेकर सर यांचे सामाजिक कार्य आदर्शवत असून भाजपा त्यांना निश्चितपणे न्याय देईल, त्यांना महत्त्वाचे पद प्रेरणा व शक्ती देण्याचे काम करेल. भारतीय जनता पार्टीच्या ,शासनाच्या, विविध विकासाच्या योजना ते तळागाळापर्यंत पोचवत आहेत विकास वलेकर सर हे ग्राउंड लेव्हल वर जाऊन कार्य करत आहेत. भविष्यात त्यांचे कार्य असेच गतीने पुढे जाणार आहे. त्यासाठी त्यांना सहकार्य करू असे विचार भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार -सावंत यांनी उदनवाडी येथे व्यक्त केले.
काल मंगळवार दि.2 मे 2023 रोजी उदनवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्हा चिटणीस मा. विकास दत्तात्रय वलेकर सर यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ अतिशय आनंदमय व उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्हा किसान सेलचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी आण्णा गायकवाड, भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार -सावंत, सोलापूर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संभाजी ( तात्या) आलदर, बुद्धेहाळ गावचे भाजपचे बूथ अध्यक्ष संतोष काळे, पाचेगाव खुर्द चे भाजपचे बूथ अध्यक्ष महेश गुरव, चोपडी गावचे भाजपचे युवा नेते धनाजी पारेकर यांनी आपल्या मनोगतातून जनसंपर्क कार्यालयाचे महत्त्व पटवून सांगितले व विकास वलेकर सर यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांगोला तालुका भाजपा उपाध्यक्ष नंदकुमार रायचुरे यांनी केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सांगोला चे माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, सांगोला तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष व बलवडी गावचे भाजपचे शक्ती प्रमुख फैजुद्दीन शेख, बलवडी गावचे भाजपचे बूथ अध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे, चोपडी गावचे पत्रकार दशरथ बाबर, सिद्धनाथ गुरव,राजुरी गावचे बूथ अध्यक्ष सूर्यकांत खुळे, भाजपचे युवा नेते निलेश गायकवाड, नाझरा गावचे भाजपचे युवा नेते अक्षय रायचुरे, मंगेश सुतार, उदनवाडी गावचे भाजपचे बूथ अध्यक्ष संदीप केंगार, अर्जुन वलेकर, अजमिर शेख, जलील मुलाणी, सिकंदर मुलाणी, फारुख मुलाणी,मा. भागवत रुपनर,. अशोक ठोंबरे , शिवाजी वलेकर (आबा), मा. प्रदीप गावडे, मा. आबासो गुरव, धनाजी वलेकर, बाळू शिंगाडे, रावसाहेब मारकड , तुकाराम सरगर, दत्तात्रय वलेकर, काशिलिंग वलेकर, साईराम वलेकर, विजय वलेकर,तसेच उदनवाडी गावातील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्हा चिटणीस मा. विकास वलेकर सर यांनी केले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा