वाटंबरे येथे ऐश्वर्या वस्त्र निकेतनचा उद्घाटन सोहळा संपन्न.
वाटंबरे येथे ऐश्वर्या वस्त्र निकेतनचा उद्घाटन सोहळा संपन्न.
वाटंबरे/प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथे पत्रकार नंदकुमार गायकवाड यांनी एसटी स्टँड चौकात नव्याने सुरू केलेल्या ऐश्वर्या वस्त्र निकेतनचे उद्घाटन संपन्न झाले .गावचे प्रथम नागरिक सरपंच किरण पवार व सोसायटी चेअरमन नाना बापू पवार यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले व वाटंबरे गावचे ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष सुब्राव बापू पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.
यावेळी या उद्घाटन सोहळ्यास ग्रामपंचायत सदस्य नामदेव पवार, शिवाजी माळी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पवार, कृषी मित्र संजय पवार , माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रतीक दादा पवार, हरी नाना पवार, भाग्यवान पवार, सागर पवार, धनाजी पवार, गणेश गायकवाड, दत्तात्रेय चंदनशिवे,फैजद्दीन शेख, सुभाष केदार, मधुकर पवार,चंद्रकांत फरतडे, अजित पवार, सचिन फरतडे, युवा नेते अथर्व निकम,तसेच मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते
.




No comments