श्रीहरी भाकरे याचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान.
सांगोला(प्रतिनिधी):-मंथन वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत सांगोल्यातील श्रीहरी दिपक भाकरे याने राज्यात सहावा क्रमांक पटकावला.नुकताच अहमदनगर येथे झालेल्या शानदार सोहळ्यात मंथन परीक्षेतील राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर होते. व्यासपीठावर सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड,साहित्यिक डॉ.संजय कळमकर,डॉ.वैभव अजमरे,डॉ.अशोक जोगदे उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीहरी भाकरे याचा सन्मान करण्यात आला.यावेळी पालक दिपक भाकरे व पुनम भाकरे उपस्थित होते.श्रीहरी भाकरे हा उत्कर्ष प्राथमिक विद्यालय सांगोला येथे इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे.या यशाबद्दल श्रीहरी भाकरे चे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा