Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, १३ मे, २०२३

सांगोला नाझरे मार्गे पुणे एसटी सुरू

 *सांगोला नाझरे मार्गे पुणे एसटी सुरू*



मागील अंकाची पुनरावृत्ती न करता केवळ फोटोसेशन साठी गाडी सुरू करू नये



नाझरे प्रतिनिधी

            सांगोला नाझरे आटपाडी मार्गे पुणे एसटी बस 13 मे रोजी सुरू झाली असून यासाठी गाडीचे पूजन हार तुरे सत्कार नाझरे ता सांगोला येथे झाले खरे परंतु फोटोसेशन साठी गाडी सुरू करू नका कायमस्वरूपी सुरू करा अशी नागरिकांची मागणी आहे

 *पुठचे पाठ मागे भुई सपाट*



            यापूर्वी नाझरे मार्गे मंगळवेढा कराड चिपळूण सोलापूर बस सुरू झाल्या त्याचीही मोठ्या धडाक्यात सत्कार झाले व काही दिवसातच गाडी बंद त्यामुळे केवळ फोटो काढण्यासाठी बस सुरू करू नका असे नागरिकांत बोलले जात आहे यासाठी राजकीय प्रवासी संघटना यांनी एसटी बस खरोखर सुरू ठेवायची असेल तर जनजागृती करणे गरजेचे आहे व एसटीने प्रवास करा व काही थोडे दिवस म्हणजे गाडी सुरळीत सुरू राहण्यासाठी थोडाफार त्याग करून एसटीची तिकिटे स्वतः घेतली पाहिजेत व बस सुरू राहण्यासाठी पाठपुरावा पाहिजे परंतु असे होत नाही म्हणजे पुढचे पाठ मागचे भुई सपाट अशी अवस्था होत आहे व केवळ डामडौल न करता व मागील अंकाची पुनरावृत्ती न करता व केवळ प्रसिद्धीसाठी गाडी सुरू न करता कायमस्वरूपी गाडी सुरू ठेवा अशी मागणी शिवाजी शिंदे गुरुजी मंगेश सुतार व नागरिकांची आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart