Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

नाझरे येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी*

 *नाझरे येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी*


नाझरे प्रतिनिधी

       जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय ,हर हर महादेव च्या गजरात नाझरे ता सांगोला येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी झाली नाझरे ग्रामपंचायत मध्ये सरपंच नवनाथ बनसोडे व ग्राम विकास अधिकारी के डी कदम यांच्या हस्ते तर चौकात पोलीस उपनिरीक्षक हेमंत कुमार काटकर यांच्या हस्ते तर वीरभद्र मंदिरात पत्रकार रविराज शेटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले

          जगातला पहिला महात्मा म्हणून बसवेश्वरांचा उल्लेख होतो व एकत्रित येऊन फटाक्यांची आतिषबाजी न करून पर्यावरणाचा समतोल न बिघडविता त्यांचे विचार आत्मसात करा असे मत सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके यांनी व्यक्त केले तर महात्मा बसवेश्वर हे समतेचे प्रतिक होते त्यांचे विचार आचरणात आणा असे मत शिक्षक नेते शिवभूषण ढोबळे यांनी सांगितले तर महात्मा बसवेश्वरांचा विचारांचा वारसा जपून सर्वांनी आचरणात आणावा असे मत शिक्षक नेते दादासो वाघमोडे यांनी व्यक्त केले

       सदर प्रसंगी सरपंच सर्व सदस्य पोलीस अधिकारी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ बसवेश्वर युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वीरशैव महिला भजनी मंडळाचे भजन व पुरोहित म्हणून रविराज स्वामी यांनी काम पाहिले सूत्रसंचालन रविराज शेटे तर सर्वांचे आभार शिक्षक नेते अशोक पाटील यांनी मानले व महाप्रसाद वाटप करण्यात आला



No comments