Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, २२ एप्रिल, २०२३

मंथन परीक्षेत जि.प.प्रा.शाळा पवारवाडी (वाटंबरे) चे घवघवीत यश.

 मंथन परीक्षेत जि.प.प्रा.शाळा पवारवाडी (वाटंबरे) चे घवघवीत यश.









राज्यस्तरीय मंथन परीक्षेमध्ये वाटंबरे ता. सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी (वाटंबरे) या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत असे उज्वल यश संपादन केले आहे.

 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी जिल्हा,राज्यस्तरावर यश मिळवून शाळेच्या गुणवत्तेचा झेंडा कायम राखला आहे. मंथन स्पर्धा परीक्षेतील इयत्ता दुसरी मधील कु.आरवी विजय पवार हिने 116 गुण मिळवत केंद्रात दुसरा जिल्ह्यात 14 वा व राज्यात सतरावा क्रमांक मिळवला आहे. इयत्ता तिसरीतील कु.स्वरा विजयदादा  पवार हिने  214 गुण मिळवून केंद्रात 1ला  जिल्ह्यात 40 वा व राज्यात 43 वा क्रमांक मिळवला आहे.या दोघींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. इयत्ता तिसरीतील अथर्व खंडू पवार याने 182 गुण,इयत्ता चौथीतील हर्षवर्धन धनाजी पवार यांने 190 गुण, इयत्ता चौथी मधील श्रावणी स्वप्निल धुकटे हिने 136 गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका श्रीम.कारंडे मॅडम यांचे  गटशिक्षणाधिकारी श्री.नाळे साहेब, नाझरा बीटचे विस्तार अधिकारी श्री.सुयोग नवले साहेब, केंद्रप्रमुख श्री.काझी साहेब,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पवारवाडी वाटंबरे येथील ग्रामस्थ व केंद्रातील सर्व शिक्षकांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यामध्ये पवारवाडी वाटंबरे येथील पालक खंडू पवार, पोपट पवार, सुनिता विजय पवार, समाधान पवार, श्री. धनाजी दामोदर पवार,सौ.सुरेखा विजयदादा पवार ,सुवर्णा धुकटे,श्री. दादासो जाधव, बाजीराव पवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती कारंडे मॅडम यांचे विशेष अभिनंदन केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart