Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सिने अभिनेते दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड यांची खंडोबा देवस्थानला सदिच्छा भेट.

 सिने अभिनेते दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड यांची खंडोबा देवस्थानला सदिच्छा भेट.

{खंडोबा देवस्थान मध्ये चित्रपटाचा मुहूर्त करण्याचा  मानस : अभिनेते दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड }




वाटंबरे/प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथे उद्योगपती बाळासाहेब भगत यांच्या निवासस्थानी भेट दिली असता सिने अभिनेते दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड यांनी  वाटंबरे येथील जागृत खंडोबा देवस्थानला सदिच्छा भेट देत दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत 'रगील' या चित्रपटाचे हिरो प्रशांत बोधगिरे त्यांच्या समवेत होते.


यावेळी त्यांनी खंडोबा देवस्थान मध्ये नवीन चित्रपटाचा मुहूर्त करून खंडोबा देवस्थान व वाटंबरे गावचे चित्रकरण करत गावातील स्थानिक कलाकारांना संधी देण्याचा मानस व्यक्त केला, तसेच शासनाच्या वतीने खंडोबा देवस्थान मध्ये सुरू असलेले विकास कामाबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

 खंडोबा देवस्थानच्या वतीने पुजारी अण्णासाहेब निकम यांनी त्यांचे शाल, श्रीफळ,फेटा देऊन सत्कार केला.



चौकट:


चित्रपट कारकीर्द


{धनी कुंकवाचा, दृष्ट लागली सौभाग्याला, आई वाचव माझ्या बाळाला या चित्रपटाचे दिग्दर्शन  सराण, फार्म हाऊस हे चित्रपट निर्मिती अवस्थेत आहेत.

दागिना ,लग्न लावते लेकीचे ,राजकारण २०१४ ,कळतय पण वळत नाही या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनेते म्हणून काम केले आहे तसेच त्यांनी वेब सिरीज वर शॉर्ट फिल्म मध्येही काम केले आहेत }




No comments