Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, १५ एप्रिल, २०२३

वाटंबरे गावाला विकासनीधी कमी पडू देणार नाही: आ.शहाजीबापु पाटील.

 वाटंबरे गावाला विकासनीधी कमी पडू देणार नाही: आ.शहाजीबापु पाटील.

{वाटंबरे येथे रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न}



वाटंबरे गावाचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, गावातील  लहान मोठ्या विकास कामांना निधी उपलब्ध करून देऊन वाटंबरे गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे आ. शहाजी बापू पाटील यांनी वाटंबरे गावातील रस्त्याच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी प्रतिपादन केले.                वाटंबरे गावात दि.१५ रोजी अजनाळे, य .मंगेवाडी, राजुरी,वाटंबरे , हटकर मंगेवाडी व वाटंबरे येथील  शिव रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते.       


   यावेळी  आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी वाटंबरे करांना वीस वर्षात  जेवढा निधी मिळाला नाही पण बापूंनी तुम्हाला तो तीन वर्षात वाटंबरे गावच्या विकासासाठी १४ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला, बापू आमदार झाल्यापासून सांगोला तालुक्याला केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे . बापू आणि मी सांगोला तालुक्याचा विकास करण्यास कटीबद्ध आहोत असे दीपक आबा साळुंखे पाटील यांनी म्हटले.

वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने आ. शहाजी बापू पाटील व आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच किरण पवार माजी सरपंच प्रवीण पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच युवा नेते गुंडा दादा खटकाळे यांचाही वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रतिक  पवार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आबा आणि बापू च्या हस्ते करण्यात आले.

यावेळी समाज सेवक महादेव पवार यांनी माण नदीवरील बंधारे भरणे, अपूर्ण सर्विस रस्त्याचे काम, खंडोबा देवस्थानच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध, एस टी महामंडळाच्या सर्व बसला वाटंबरे गावात थांबा करावा, माण नदीला कॅनालचा दर्जा देण्याची  आबा व बापूकडे मागणी केली. 

या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कय्युम मुलांनी, ग्रामसेवक मेटकरी तसेच वाटंबरे गावातील सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विजय पवार यांनी गावातील  विकास कामाला निधी उपलब्ध करून देण्याची  मागणी केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार सर यांनी केले .


चौकट:

{बापूंनी  गावच्या विकासासाठी  दिलेला निधीच्या मानाने तुम्ही बापूंचा सत्कार केलेला नाही अशी मीश्किल टिप्पणी  दिपक आबांनी करताच  उपस्थित मध्ये एकच हशा  पिकला.


 आमदार दिपक आबा साळुंखे पाटील .}




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart