वाटंबरे येथील श्रीक्षेत्र जागृत देवस्थान खंडोबाच्या चैत्र नवरात्र महोत्सवाला आज पासून सुरुवात.
वाटंबरे येथील श्रीक्षेत्र जागृत देवस्थान खंडोबाच्या चैत्र नवरात्र महोत्सवाला आज पासून सुरुवात.
महाराष्ट्र कर्नाटक मध्ये प्रसिद्ध असलेले सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या चैत्र नवरात्र महोत्सवाला मंगळवारी दि २८ मार्च २०२३ पासून सुरुवात होणार आहे. चैत्र शुद्ध सप्तमी मंगळवारी दि २८ मार्च २०२३ रोजी घट स्थापना .चैत्र शुद्ध चतुर्दशी बुधवार दि ५ एप्रिल २०२३ रोजी हनुमान जयंती उपवास. चैत्र शुद्ध पौर्णिमा गुरुवार दि.६ एप्रिल २०२३ रोजी हनुमान जयंती घट उत्थापन . चैत्र वैद्य प्रतिपदा शुक्रवार दि. ७ एप्रिल २०२३ रोजी सल्ला व पालखी प्रदक्षिणा .चैत्र वैद्य द्वितीया शनिवार दि ८ एप्रिल २०२३ श्री खंडोबा देवस्थान ची यात्रा दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी लंगर व पालखी प्रदक्षिणा.
वरील प्रमाणे सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत सायंकाळी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याचे आव्हान खंडोबा देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.





No comments