Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

नातवाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत वाटंबरे येथील आजीने शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार खाण्यासाठी प्लेट्स दिल्या भेट.

 नातवाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत वाटंबरे येथील  आजीने शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार खाण्यासाठी प्लेट्स  दिल्या भेट.



वाटंबरे /प्रतिनिधी: वाटंबरे तालुका सांगोला येथील सेवानिवृत्त आरोग्य सेविका अंबु कोळेकर यांनी आपला नातू अर्जुन संतोष सरगर याच्या वाढदिवसानिमित्त  सामाजिक बांधिलकी जपत अनावश्यक खर्चाला फाटा देत पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार खाण्यासाठी लागणाऱ्या प्लेट्स भेट म्हणून दिल्या .

यावेळी मुख्याध्यापिका तेली मॅडम यांनी सेवानिवृत्त आरोग्य सेविका अंबू कोळेकर  यांनी  घेतलेल्या या निर्णयाचे  कौतुक केले  तसेच  अर्जुनला वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या तसेच  शाळेच्या वतीने आरोग्य सेविका अंबू कोळेकर यांचा सत्कार केला . या सत्कार समारंभ प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय पवार,शिक्षक वर्ग कोकरे गुरुजी, मासाळ गुरुजी,   पवार मॅडम व सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

यावेळेस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अर्जुनला  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.




No comments