Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मेट्रोपॉलीस लॅब व ईनामदार क्लिनिकल लॅबोरेटरी उद्घाटन शुभारंभ.

 मेट्रोपॉलीस लॅब व ईनामदार क्लिनिकल लॅबोरेटरी उद्घाटन शुभारंभ...

मंगळवेढा /प्रतिनिधी:


अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शहरातील आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये संपर्क  आणि प्रामाणिक भावनेने कार्य करून रुग्णाना सेवा देण्याचे काम दावल इनामदार यांनी केल्याचे गौरवोउदगार प्रांताधिकारी आप्पासाहेब समींदर यांनी व्यक्त केले      

              मेट्रोपॉलीस व इनामदार क्लिनीकल लॅबोरेटरी च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील,पोलीस निरीक्षक स्वप्नील रावडे  डॉ श्रीनिवास कोरुलकर


डॉ अतुल निकम ,निमा, अध्यक्ष डॉ पुष्पांजली शिंदे, नूतन प्रशासकिय अधिकारी रोहित भगरे , मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव,पांडुरंग ताड,सभापती सोमनाथ अवताडे, दिगंबर भगरे, अजित जगताप ,प्रवीण खवतोडे,राहुल ताड, सत्यजीत सुरवसे ,सचिन शिंदे,युवराज घुले,डॉ मधुकर कुंभारे,डॉ.महेश कोनली,

डॉ.लक्ष्मीकांत मर्दा,डॉ. नितीन चौंडे, डॉ कश्मिरा रत्नपारखी,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील म्हणाल्या की,अनेक संतांच्या वास्तव्याने आणि पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मंगळवेढा शहरांमध्ये इनामदार बंधू यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आरोग्य सेवेचे व्रत अखंडितपणे सुरू आहे. आज पासून आपल्या सर्वांच्या सेवेत साकार होत असलेल्या मेट्रोपॉलीस व इनामदार 

क्लिनिकल लॅबोरेटरी या आरोग्य दालनाच्या माध्यमातून शहराच्या भौतिक आणि आरोग्य सुविधांचे वैभव वाढण्यास खूप मोठी मदत होईल,

तहसीलदार स्वप्नील रावडे म्हणाले की -आपल्या संस्कृतीतील सुभाषित म्हणजे आरोग्यम् धनसंपदा परंतु खर्‍या अर्थाने आपल्या आरोग्याची संपदा संतुलित ठेवायचे असेल तर आपल्या शरीराची वेळोवेळी योग्य आरोग्य दालनामध्ये तपासणी अथवा चाचणी करून आपले शारीरिक संतुलन बाधित ठेवले पाहिजे.


प्रास्ताविक नसीर शेख, सूत्रसंचालन संतोष मिसाळ सर व आभार दावल नामदार यांनी मानले.


No comments