Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडून वाटंबरेच्या कन्येचा सन्मान.

 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडून वाटंबरेच्या कन्येचा सन्मान.

{लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक व गोल्ड मेडल देऊन केले सन्मानित}



वाटंबरे/प्रतिनिधी:वाटंबरे गावाची सुकन्या कु. शितल बाजीराव पवार हिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून अर्थशास्त्र या विषयामध्ये राज्यात प्रथम क्रमांक  मिळवला.गुरुवारी 


दि.२३ फेब्रुवारी २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे २८वा दीक्षांत समारंभ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमांमध्ये कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांचे हस्ते तिला लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक व गोल्ड मेडल ने सन्मानित करण्यात आले. या दीक्षांत समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मा .राज्यपाल श्री. रमेश बैस होते तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील होते तसेच कुलगुरू डॉ. इंद्र मनी व कुलसचिव मा.भटूप्रसाद  पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. सांगोला तालुक्यातील वाटंबरे सारख्या ग्रामीण भागातील मुलीने  जिद्द, चिकाटीच्या, जोरावर अर्थशास्त्र यासारख्या विषयांमध्ये यश मिळवत  राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे वाटंबरे गावातून तसेच सांगोला तालुक्यामधून तिच्यावर शुभेच्छाचा  वर्षाव होत आहे. तिच्या अलौकिक कामगिरीने वाटंबरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रवण्याचे काम तिने केले आहे.




शितल पवार 

{माझ्या यशामध्ये  आई, वडील  व श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाटंबरे या प्रशालेचा सिंहाचा वाटा आहे तसेच या प्रशालेतील अर्थशास्त्र या विषयाचे शिक्षक यादव सरांनी अर्थशास्त्र हा विषय घेण्यासाठी मला वेळोवेळी प्रोत्साहित केल्यामुळे आज मी अर्थशास्त्र या विषयांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्यात यशस्वी होऊ शकली }




No comments