सांगोला तालुक्याचा जनावरांचा आठवडी बाजार त्वरित सुरु करावा.
सांगोला तालुक्याचा जनावरांचा आठवडी बाजार त्वरित सुरु करावा.
{अखिल भारतीय मजदूर सेवा संघाच्या वतीने तहसीलदार याना लेखी निवेदनाद्वारे केली मागणी }
वाट़बरे/प्रतिनिधी: महाराष्ट्रात जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेला सांगोला तालुक्याचा जनावरांचा आठवडी बाजार लंम्पी या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शासनाने बंद ठेवलेला आहे परंतु आता लंम्पी या रोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे परिस्थिती पूर्व पदावर आली आहे . तालुक्यातील डाळिंब पीक नष्ट झाल्यामुळे शेतकरी वर्ग हा कृषी उद्योग, पशुपालन व दुग्ध व्यवसायावर आपली उपजीविका करीत आहे त्यातच आठवडी बाजार बंद असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आहे तालुक्यातील राजकीय पक्ष विविध संस्थेने आठवडी बाजार चालू करण्याबाबत मागणी केली आहे तरी आपण शेतकरी यांच्या विषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून आठवडी बाजार चालू करावा अशी मागणी अखिल भारतीय मजदूर सेवा संघाच्या वतीने तहसील कार्यालय येथे दि. २३ फेब्रुवारी गुरुवारी मा. नायब तहसीलदार किशोर बडवे यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय मजदूर सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल गेजगे तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर, शिवबाराजे पतसंस्थेचे चेअरमन भाग्यवान पवार, पत्रकार दत्तात्रय पवार, पत्रकार नंदकुमार गायकवाड, पत्रकार वसीम पठाण, भागवत साळुंखे व अखिल भारतीय मजूर कल्याण सेवा संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.




No comments