विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून खऱ्या अर्थाने आज शिवजयंती साजरी केली गेली: डॉ. कलाल
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून खऱ्या अर्थाने आज शिवजयंती साजरी केली गेली: डॉ. कलाल
{केंद्र शाळा वाटंबरे व प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न}
वाटंबरे/प्रतिनिधी: शिवजयंतीच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे व शाळा व्यवस्थापन समितीने जो विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम राबविला आहे खऱ्या अर्थाने त्यांनी विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी करून शिवजयंती साजरी केली आहे . विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे त्यासाठी त्यांचे आरोग्य तपासणी ही गरजीचे आहे असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर कलाल यांनी आपल्या भाषणात म्हटले.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे व प्राथमिक आरोग्य केंद्र नांझरे यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षी शिवजयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांची सीबीसी टेस्ट करत आरोग्याची तपासणी केली गेली.या वेळी अध्यक्षीय भाषणात वाटंबरे गावचे सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम पवार गुरुजी यांनी कौशल्य, स्फूर्ती, चेतना, यामधून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे म्हटले. तसेच शाळेने राबवलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीच्या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आरोग्य सेवक डॉक्टर कलाल, डॉक्टर मुकेश सरगर व अध्यक्ष पवार गुरुजी यांच्या हस्ते शिवरायांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी आरोग्य सेविका ढावरे , माझी तंटामुक्ती अध्यक्ष गणपत पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय पवार हे सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा ही राज्य गीत गायले गेले .
या गीत गायना नंतर विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आपली भाषणे सादर करुन शिवरायांना वंदन केले.यावेळी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार यावेळी शाळेच्या वतीने घेण्यात आले.शाळेतील शिक्षक पांडुरंग कोकरे सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले परक्यांची गुलामगिरी संपून स्वराज्य निर्माण करून शिवरायांनी जगासमोर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली आणि त्यानंतर जगातील अनेक देश त्यांचे प्रेरणेने स्वतंत्र झाले असे म्हटले.
प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे येथील मुकेश सरगर यांनी विद्यार्थ्यांची सीबीसी टेस्ट केली त्यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्याची तपासणी करून शिवजयंती निमित्त आरोग्य जागृती विषयी एक सकारात्मक संदेश त्यांनी यावेळी दिला.या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पवार तसेच समितीतील सर्व सदस्य, वाटंबरे गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष गणपत पवार ,इंजिनीयर यादव साहेब ,शाळेतील पालक तुकाराम गेजगे , तसेच शाळेतील पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकरे सर यांनी केले तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मासाळ सर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तेली मॅडम, मिसाळ मॅडम, तसेच सर्व शिक्षकांनी मोठे प्रमाणात परीश्रम घेतले.








No comments