संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती कात्रज सच्यमाता पुणे परिसरात उत्सवात साजरी .
संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती कात्रज सच्यमाता पुणे परिसरात उत्सवात साजरी .
वाटंबरे/प्रतिनीधी : दि.15/02/2023 रोजी कात्रज सच्य माता पुणे परिसरात संत शिरोमणी सेवालाल महाराज जयंती उत्सवात पार पडली .या वेळी सच्य माता मंदिर ते भोसले फार्म हाऊस पर्यंत सेवालाल महाराजांचा फोटो रथाामध्ये ठेवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बंजारा बांधवांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा व पेहराव केला होता व नृत्य सादर केले यावेळी मिरवणुकीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई ताई यांनी बंजारा महिला व बंजारा बांधव सोबत नृत्याचा आनंद घेतला व त्यांच्याबरोबर नृत्य मध्ये सहभागी झाल्या सेवालाल महाराज की जय च्या घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख मान्यवर संतोष पवार उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते भोग व पूजा करण्यात आली ,चंदर (भाऊ) राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र , ॲ. रमेश खेमू राठोड ,स्वराज नरेश बाबर युवा नेते, विकी (भाऊ )खेतकर सामाजिक कार्यकर्ते, कात्रज उत्सव समिती अध्यक्ष लालू फुलसिंग झरपला व भीमा भाऊ राठोड उपाध्यक्ष व झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य)चे संस्थापक /अध्यक्ष कांता (भाऊ) राठोड व झेप फाऊंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य)चे सदस्य ॲ. राजकुमार पवार साहेब व गोरबंजारा गायक अनिल चव्हाण व त्यांचे सहकारी व कात्रज उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व तमाम गोर बंजारा बांधव उपस्थित होते.
यावेळी गोर बंजारा बांधवांना युवा नेते स्वराज बाबर यांनी सेवालाल महाराजांची कारकीर्द व त्यांनी केलेल्या महान कार्याचा आढावा लोकांसमोर सादर केला व कात्रज परिसरातील गोरबंजारांना कधीही कुठली अडचण येऊ देणार नाही व त्या अडचणीचे निरसन करण्यात येईल याची ग्वाही दिली संत सेवालाल महाराज सभागृहासाठी जागा मिळावी ही मागणी चंद्र भाऊ राठोड यांनी त्यांच्याकडे सर्व गोरबंजारांच्या वतीने केली होती त्यावर स्वराज बाबर यांनी सेवालाल महाराजांच्या सभागृहासाठी जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू व ती मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.ॲ. राजकुमार पवार साहेब यांनी गोरबंजारा लोकाना मार्गदर्शन केले व संत सेवालाल महाराज व लाखा सिंग महाराज यांच्या कारकिर्दीची व कार्याची माहिती दिली त्यांच्या शिकवणीप्रमाणे गोरबंजारांनी अनुकरण करावे व त्याप्रमाणे चालावे व समाजामध्ये परिवर्तन घडवून आणावे व आपल्या मुलाबाळांना सुशिक्षित करून मोठ्या प्रमाणात समाजातील गरिबी दारिद्र्य दूर करावे असे सांगण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गोरबंजारा बांधवांना भोजनाची सोय करण्यात आली होती व या कार्यक्रमा च्या शेवटी संयोजकाच्या वतीने गोरबंजारा बंधू-भगिनींचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.




No comments