वशिॅप अर्थ फाउंडेशनच्या वतीने माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन स्वच्छता मोहीम अनोख्या पद्धतीने साजरी.
वशिॅप अर्थ फाउंडेशनच्या वतीने माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन स्वच्छता मोहीम अनोख्या पद्धतीने साजरी.
वाटंबरे/प्रतिनीधी: वशिॅप अर्थ फाउंडेशनच्या वतीने माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला या वेळी पुणे येथील भिडे पूल मुळा, मुठा नदीपात्रातील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . या वेळी नदीपात्रातील घाण ,कचरा, स्वच्छ केला व तमाम जनतेला स्वच्छ नदी व स्वच्छ भारत करण्यासाठी आव्हान व जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. डॉ. ज्ञानेश्वर मुळे सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत सरकार, मा. श्री श्रीकांत देशपांडे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मा. श्री राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे, मा.श्री राजेश पांडे सल्लागार राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य, मा. श्री जेम्स फुलहृृम आयर्न मॅन (10वेळा) न्युझीलँड, आम्रपाली चव्हाण मॅडम व पूर्ण संयोजक व त्यांची टीम तसेच झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य )चे संस्थापक/ अध्यक्ष कांता (भाऊ) राठोड, सचिव शिवाजी मुसळे, उपाध्यक्ष विलास अंधारे ,सत्या फाउंडेशनच्या अध्यक्ष गीतांजली ताई ,रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, संतोष काळे व इतर पदाधिकारी तसेच वेगवेगळ्या संस्था, संघटना ,कॉलेजमधील, शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली व स्वच्छता मोहीम कार्यक्रम राबवला.
या कार्यक्रमासाठी झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य) ने सहभाग दर्शवला व स्वच्छता मोहीम राबवली व यापुढेही असे स्वच्छता मोहिमेचे कार्यक्रम हाती घेऊ व नदी स्वच्छ करत जाऊ ही ग्वाही दिली.





No comments