अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल गेजगे यांची निवड .
अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल गेजगे यांची निवड .
{विठ्ठल गेजगे यांच्या रूपाने वाटंबरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा}
दि . 14 फेब्रुवारी मंगळवारी सांगोला तालुका वाटंबरे या गावी अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेला सचिन फडतरे वीभागीय पुणे मंडल ॲक्शन कमिटी अध्यक्ष,लक्ष्मण चंदनशिवे विभागीय पुणे मंडळ शिक्षण सचिव, व अजय एन.खंडागळे सोलापूर जिल्हाध्यक्ष या सर्व मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली सदरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनिल सांयकली सोलापूर शहर अध्यक्ष ,प्रदिप गायकवाड ,सोलापूर शहर संघटन मंत्री या वेळी उपस्थित होते.या वेळी सांगोला तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल गेजगे यांची ता.अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्त्यांना नियुक्ती पत्र देत त्चाचा सत्कार यावेळी घेण्यात आला.
या कार्यशाऴेला यलमार मंगेवाडी गावचे ग्रामसेवक भडंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य कबीर गेजगे, तुकाराम गेजगे, समीर चन्ने, सिद्धेश्वर माळी, धनाजी पवार, तानाजी पवार, शिवाजी गेजगे ,उत्तम गेजगे तसेच मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष विठ्ठल गेजगे यांचा त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.





No comments