महिला सबलीकरणासाठी झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य )यांनी उचलले एक यशस्वी पाऊल.
महिला सबलीकरणासाठी झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य )यांनी उचलले एक यशस्वी पाऊल.
महिलांनी जीवनात आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी देवांशी ग्रुप ऑफ कंपनी व झेप फाउंडेशन पुणे यांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत या अंतर्गत महिलांना लघु उद्योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर केले जात आहे अगरबत्ती व समईवात या लघु व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी देवांशी ग्रुप व झेप फाउंडेशन पुणे यांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून देवांशी ग्रुप ऑफ कंपनी व झेप फाउंडेशनचे (महाराष्ट्र राज्य )चे संस्थापक/ अध्यक्ष कांता( भाऊ) राठोड व पुणे जिल्हा महिला सचिव रूपालीताई सावंत मॅडम व पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमान प्रयत्नातुन सांगोला येथे महीलाना अगरबत्ती मशीन व वात मशिनचे वितरण करण्यात आले व त्याचा कश्या पद्धतीने वापर करायचा याची माहिती त्या वेळी देण्यात आली . या वेळी देवांशी ग्रुप ऑफ कंपनी व झेप फाउंडेशन यांच्या माध्यमातून महिलांना लघुउद्योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असे झेप फाउंडेशनचे अध्यक्ष कांता भाऊ राठोड यांनी म्हटले तसेच यावेळी महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आव्हान केले तसेच त्यांनी व्यवसाय सुरू केलेल्या महिलांना शुभेच्छा दील्या
.




No comments