Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

जि .प .प्राथमीक केंद्र शाळा वाटंबरे येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

 जि .प .प्राथमीक केंद्र शाळा वाटंबरे येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.




सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत दि. ३ जानेवारी २०२३ रोजी मंगळवारी भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, महान समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती  मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. यावेळी



शाळेतील विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांचा वेष परिधान करून आल्या होत्या.विद्यार्थीनींच्याच  हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले. 

   यावेळी आदिती साळुंखे, रसिका गेजगे,जिनिषा गेजगे, राजकन्या माळी या विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर छान मनोगते व्यक्त केली.त्याचबरोबर शाळेतील शिक्षक श्री पांडुरंग कोकरे सर यांनीही सावित्रीबाईंच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला.तसेच त्यानंतर मुलींनी फुगड्या खेळल्या.संगीतखुर्च्या व विविध खेळांचा आनंद घेतला.

  यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका तेली मॅडम, कोकरे गुरुजी व मासाळ गुरुजी उपस्थित होते.



No comments