वाटंबरे येथील गावठाण अंगणवाडी मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
वाटंबरे येथील गावठाण अंगणवाडी मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
सांगोला तालुका वाटंबरे येथील गावठाण अंगणवाडीत दि. ३ जानेवारी २०२३ मंगळवारी भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
अंगणवाडी सेविका शर्मिला पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी शाळेतील सर्व लहान मुलीं सावित्रीबाई फुले यांचा वेष परिधान करून आल्या होत्या.
या जयंतीस अंगणवाडी सेविका शारदा माळी, अंगणवाडी मदतनीस मैनाबाई भंडारे तसेच पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.





No comments