जागतिक अपंग दिनानिमित्त सांगोला येथील अपंग दत्ता जाधव यांनी शासनाकडे अपंगासाठी केल्या या मागण्या.
जागतिक अपंग दिनानिमित्त वाटंबरे येथील अपंग दत्ता जाधव यांनी शासनाकडे अपंगासाठी केल्या या मागण्या.
अपंग दत्तात्रय रामचंद्र जाधव वाटंबरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त शासनाकडे अपंगांसाठी या मागण्या केल्या. सांगोला सरकारी आरोग्य केंद्रात दिव्यांग सर्टिफिकेट घेण्याची व्यवस्था शासनाने करावी, पेन्शन ऐवजी उद्योग धंदा शासकीय फंडातून उदरनिर्वाह करण्यासाठी उपजीविकेचे साधन देण्यात यावे ,
ग्रामपंचायत मार्फत पाच टक्के निधी व जिल्हा समाज कल्याण व स्थानिक स्वराज्य संस्था आमदार निधी तून उद्योग धंद्यासाठी चालना देण्यात यावी,दिव्यांग व्यक्तींना समृद्ध करण्यासाठी शासनाने गटई स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावे व दिव्यांगांना समर्थ करण्यावर भर द्यावा. शासनाने शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व मोफत शिक्षण व्यवस्था करावी, बाल दिव्यांग व्यक्ती 6 ते 14 शिक्षण मोफत देण्यात यावे ,प्रोढ दिव्यांगासाठी प्रशिक्षणाची सोय करण्यात यावी.
या मागण्या शासनाकडून त्यांनी अपंग दिना दिवशी केल्या.

No comments