वाटंबरे येथे पुजारी क्लिनिकल लॅबोरेटरी चे उद्घाटन संपन्न.
वाटंबरे येथे नव्याने सुरू केलेल्या रणजीत पुजारी यांच्या पुजारी क्लीनिकल लॅबोरेटरी चे उद्घाटन दबडे हॉस्पिटलचे डॉ. दबडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
रणजीत पुजारी यांनी सुरू केलेल्या पुजारी क्लीनिकल लॅबोरेटरी मुळे वाटंबरे गावातील नागरिकांना तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिकांना रक्त लघवी तपासण्यासाठी सांगोला न जाता वाटंबरे येथे तपासून घेता येणार आहे याचा मोठ्या प्रमाणावर सर्व नागरिकांना फायदा होणार आहे.
या उद्घाटनाला वाटंबरे ग्रामपंचायत सदस्य नामदेव पवार, हसन मुलानी,सोसायटी चेअरमन नाना बापू पवार ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुब्रावबापू पवार, माजी सोसायटी चेअरमन अनिल पवार, जलतज्ञ व भाजप सरचिटणीस मधुकर पवार सर, पत्रकार नंदकुमार गायकवाड, धीरज पवार ,तौहीत मुलानी, प्रवीण पवार, दत्तात्रय चंदनशिवे व मोठ्या प्रमाणात वाटंबरे ग्रामस्थ या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.

No comments