२६ मोटारसायकल हस्तगत करून एकुण ११, लाख १५ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त
२६ मोटारसायकल हस्तगत करून एकुण ११, लाख १५ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त
{सांगोला पोलिसांची दमदार कामगिरी}
सांगोला पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या पाच अरोपाना पकडून गुन्हा उघडकीस आणुन त्यांचे कडुन एकुण २६ मोटारसायकल हस्तगत करून एकुण ११, लाख १५ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात यश मिळवले
याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगोला पोलीस स्टेशनच्या हददीत घडलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्हयांचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा राजश्री पाटील यांचे मार्गर्शनाखाली नागेश यमगर, व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गणेश मेटकरी, अंकुश नलवडे, निशन्त सावजी यांनी संशयीत आरोपी महंमदहुसेन साहेब शेख रा. रेवणेगल्ली, तांदुळमार्केट मिरज ता. मिरज जि. सांगली. संतोष सिदधु शिंगे रा. मिरज ता. मिरज जि. सांगली यांस मिरज येथुन ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयात अटक करुन अधिक तपास केला असता या आरोपीने मिरज, कागवाड व इतर जिल्हयातुन वेगवेगळया ठिकाणाहुन १५ मोटार सायकल चोरल्याचे कबुली देवुन त्या मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे विक्री केल्याचे सांगीतल्याने त्याप्रमाणे १५ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहे ह्या जप्त करण्यात आलेला मुददेमाल हा अंदाजे ८ लाख३५ हजार रुपये किंमतीचा आहे..
तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या शोध पथकातील पोलीस दत्ता वजाळे, अभिजित मोहोळकर, बाबासो पाटील, चालक काशीद यांनी संशयीत आरोपी सोपान वैजिनाथ वगरे रा. गुंफावाडी ता. लातूर जि. लातूर पप्पु उर्फ ज्ञानेश्वर रावसाहेब बुरंगे रा. जवळा ता. सांगोला जि. सोलापुर अमोल बिरा वगरे रा. बुरंगेवाडी ता. सांगोला जि. सोलापुर यांना सदर गुन्हयात अटक करुन अधिक तपास केला असता सदर आरोपीने सोलापुर व इतर जिल्हयातुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन ११ मोटार सायकल चोरल्याचे कबुली देवुन त्या सांगोला तालुक्यातील जवळा , बुरंगेवाडी, तरंगेवाडी येथे विक्री केल्याचे सांगीतल्याने आरोपीने सांगीतले प्रमाणे ११ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहे. तरी सदर जप्त करण्यात आलेला मुददेमाल हा अंदाजे २ लाख,८० हजार रुपये किंमतीचा आहे. तरी वरील दोन्ही पथकांनी अटक केलेल्या आरोपींकडुन एकुण २६ मोटरसायकली जप्त करून ११,१५,०००/- रू. किंमतीचा चोरीस गेलेला मुददेमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे.
या गुन्हयाचा तपास शिरीष सरदेशपांडे पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण, हिम्मत जाधव अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण, श्रीमती राजश्री पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा, पोनि अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरिक्षक नागेश यमगर, प्रशांत हुले, दत्ता वजाळे, अभिजीत मोहोळकर, बाबासाहेब पाटील, गणेश मेटकरी, अंकुश नलवडे, निशांन्त सांवजी, चालक संभाजी काशीद व सायबर पोलीस स्टेशन कडील युसुफ पठाण यांनी मदत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

No comments