झेप फाउंडेशनच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.
झेप फाउंडेशनच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.
झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक/ अध्यक्ष कांता (भाऊ) राठोड व सचिव शिवाजी मुसळे तसेच सर्व पदाधिकारी यांच्या संयोगाने झेप फाउंडेशन ने आतापर्यंत खूप समाजकार्य केले आहे .
दिवाळीमध्ये कात्रज पुणे येथील पुणा जेरियट्रिक केअर सेंटर येथे दिवाळी फराळाचे वाटप केले व वृद्ध आजी-आजोबा यांच्या बरोबर वेळ घालवला त्यांना दिवाळीमध्ये एकटेपणा वाटू नये म्हणून त्यांच्याबरोबर काही वेळ घालवून दिवाळी साजरी केली तसे पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना फळे, व फराळाचे वाटप केले.17 नोव्हेंबर रोजी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सरकारने 20 मुलापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्या विरोधात मराठी शाळा वाचवण्यासाठी भिडे वाडा ते शिवनेरी किल्ल्यापर्यंत 100 किलोमीटर धावत शिक्षण ज्योतकाढण्यात आली त्यामध्ये झेप फाउंडेशनचा सहभाग होता .
झेप फाउंडेशनचे उद्दिष्ट समाजातील गोरगरीब व वृद्ध व अनाथ मुलांसाठी व झाडे लावा झाडे जगवा यासाठी काम करते तसेच कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य,समाजसेवा, स्त्री संरक्षण, या क्षेत्रासाठी समाजामध्ये जनजागृती ची कामे करते. समाजातील जेष्ठ नागरिकांना एकत्र आणणे त्यांचे दैनंदिन जीवन सुखा समाधानने व्यतीत करण्यासाठी मदत करणे, त्यांचे आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त सल्ला देणे, परस्पर विचार विनिमय करणे, जेष्ठाच्या विविध समस्या संबंधी व्याख्याने, परिसंवाद ,चर्चासत्रे, संमेलन आयोजित करणे. वाचनालय, विरुळा केंद्र, वद्राश्रम स्थापन करणे, मनोरंजनाचे कार्यक्रम योजने ,ज्येष्ठ नागरिक संघ बनवणे, सरकारकडील जेष्ठ नागरिकांच्या ज्या काही योजना असतील ते मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
झेप फाउंडेशन च्या वतीने रोहित मदनलाल गांधी अहमदनगर जिल्हा सचिव, रूपाली सावंत महिला पुणे जिल्हा सचिव, आबासाहेब सोनवणे बारामती तालुका अध्यक्ष, मंजुळा म्हात्रे महिला पेण( रायगड) तालुका सचिव, शरद निकम वाळवा तालुका सचिव, प्राध्यापक अंजली जाधव महिला सांगोला तालुका सचिव या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर पदाधिकारी निवड केली जाणार आहे ही निवड झेप फाउंडेशन च्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती झेप फाउंडेशनचे संस्थापक यांच्याकडून देण्यात आली .

No comments