हिमाचल प्रदेशातील सत्तांतरामागे जुनी पेन्शन हाच मुद्दा कळीचा ठरला- कृष्णदेव पवार*
*हिमाचल प्रदेशातील सत्तांतरामागे जुनी पेन्शन हाच मुद्दा कळीचा ठरला- कृष्णदेव पवार*
८ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. कॉंग्रेस पक्षाने पूर्ण बहुमत मिळवत सत्ता काबीज केली. जुनी पेन्शन विरूद्ध नवीन पेन्शन असा संघर्ष हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत झाला. कर्मचाऱ्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. सत्ताधारी पक्षाने कर्मचाऱ्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही पेन्शन फायटर मागे हटले नाहीत..!! शेवटी VOTE FOR OPS या तत्वाशी एकनिष्ठ राहत जुनी पेन्शन देणारा पक्ष सत्तेवर आणला. जो पेन्शन देणार तोच आता सत्तेत राहणार..!! हिमाचल प्रदेशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या एकजुटीला मानाचा मुजरा , अशी भावना सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे प्रवक्ते कृष्णदेव पवार यांनी व्यक्त केली.
कॉंग्रेस पक्षाने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन जुनी पेन्शन मुद्द्यावर ठामपणे भूमिका मांडली. राजस्थान, छत्तीसगढ मध्ये जुनी पेन्शन लागू केली. हिमाचल प्रदेश मध्ये सत्तेत आल्यास पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन फलस्वरुप आपण बघतोय हिमाचल प्रदेशातील कर्मचारी एकगठ्ठा कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी राहीले. जुनी पेन्शनचा नवीन पेन्शन विरोधातील हा ऐतिहासिक विजय आहे, यावेळी सोलापूर जिल्ह्यातील हजारो पेन्शन फायटर कर्मचाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला, यावेळी राज्य पदाधिकारी प्रशांत लंबे, दिगंबर तोडकरी, राम फलफले, जिल्हा नेते तात्यासाहेब जाधव, राम शिंदे, किरण काळे, साईनाथ देवकर, आशिष चव्हाण, अर्जुन पिसे, सचिन क्षिरसागर, ज्ञानेश्वर चव्हाण,शिवानंद बारबोले,संजय ननवरे, सैदाप्पा कोळी, दत्तात्रय गोरे, संदीप गायकवाड, मोहन पवार, सतीश चिंदे, सतीश लेंडवे, विठ्ठल पाटील, बाबासाहेब घोडके, विजय राऊत, कृष्णदेव पवार, धनंजय धबधबे, गणेश कुडले, चंद्रकांत सुरवसे, उमेश सरवळे , उमेश उघडे, नमिता शिर्के, गायत्री काळे, स्वाती नलावडे, दिपाली स्वामी, अरुण चौगुले, अरुण राठोड, कमलाकर दावणे, प्रविण देशमुख, राजेंद्र सुर्यवंशी, स्वाती चोपडे, दिपक वडवेराव, रियाज मुलाणी, राजेंद्र कांबळे, महेश कसबे, नेताजी रणदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments