वाटंबरे गावातील नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरावी अन्यथा नळ कनेक्शन कट करण्यात येणार: ग्रामपंचायत वाटंबरे
वाटंबरे गावातील नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरावी अन्यथा नळ कनेक्शन कट करण्यात येणार: ग्रामपंचायत वाटंबरे
{ ग्रामपंचायत वाटंबरे येणार ॲक्शन मोडमध्ये}
वाटंबरे/प्रतिनिधी:वाटंबरे गावातील सर्व नागरीकांनी आपल्याकडे थकीत असलेली घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आव्हान सरपंच किरण पवार, उपसरपंच मोनिका निकम व ग्रामविकास अधिकारी एस,आर,मोहीते व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी वाटंबरे गावातील नागरिकांना केले आहे.
ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर कर हे ग्रामपंचायतचे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो.
गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर,व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे
गावच्या विकासासाठी थकबाकी वसुली होणे गरजेचे आहे तरी वाटंबरे गावातील नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे अन्यथा जे नागरिक थकबाकीदार आहेत त्यांचे नळ कनेक्शन कट करण्यात येणार आहे तरी वाटंबरे गावातील नागरिकांना ग्रामपंचायतीचा कर भरूण ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आव्हान ग्रामपंचायत वाटंबरे यांनी केले आहे.



No comments