गुरुवार, २ जुलै, २०२६
भाजप सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याची मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) कार्यशाळा उत्साहात संपन्न :- जिल्हाअध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत
ॲड. संदिप कागदे यांचे 'पत्रकारिते संबंधी कायदे' विषयावर व्याख्यान संपन्न
ॲड. संदिप कागदे यांचे 'पत्रकारिते संबंधी कायदे' विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी :
मराठी पत्रकार संघ पंढरपूर यांच्या वतीने चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र ता.पंढरपूर येथे 26 जून 2026 रोजी 'पत्रकारिते संबंधी कायदे' विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,
कार्यक्रमाच्या सत्रात विविध वैचारिक विषयावर चर्चा करण्यात आली.
ॲड. संदिप कागदे यांनी भारतीय राज्य घटना , मूलभूत अधिकार , अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्या वरील निर्बंध , वैयक्तिक जीवनाचा अधिकार, अब्रूनुकसानीचा कायदा या सह पत्रकारितेशी संबंधित विविध कायदेशीर बाबींवर उपस्थित पत्रकारांना सविस्तर मार्गदर्शन केले. वृत्तांकन करताना पत्रकारांनी कायद्याच्या चौकटीत राहून जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी अधोरेखित केली. तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच पत्रकारांची कर्तव्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व या विषयी त्यांनी मार्गदर्शन केला.
ॲड. संदिप कागदे यांचे शिक्षण बी. एस. सी., एल. एल. एम., सेट, नेट. (B.Sc.,L.L.M.,S.E.T., N.E.T) आहे. त्यांना विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल व महत्वपूर्ण योगदान दिल्या बद्दल विश्वभूषण डॉ. बाबा साहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर च्या वतीने "विधीज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार" देउन गौरवण्यात आले आहे. सत्र न्यायालय व मुंबई उच्चन्यायालय येथे विविध प्रकारच्या फौजदारी केसेस चालवन्याचा त्यांना अनुभव आहे, कायदा, शिक्षण, युवा सक्षमीकरण आणि पत्रकार सक्षमीकरण ह्यामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
चिंचणी येथे आयोजित मराठी पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप'(CONSTITUTIONAL PRESPECTIVE OF FREEDOM OF SPEECH AND EXPRESSION) आणि अब्रूनुकसानीचा कायदा (LAW OF DEFAMATION) या विषयावर ते बोलत होते.
ह्यावेळी ॲड. संदिप कागदे यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन जेष्ठ पत्रकार हरिभाऊ प्रक्षाळे यांनी सत्कार केला.
मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास संघटनेचे राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन मराठी पत्रकार संघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अपराजित सर्वगोड यांनी केले होते.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी पत्रकार संघटनेच्या विधायक उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राचे मोहन अनपट, सचिन कुलकर्णी, प्रवीण नागणे यांनी पत्रकार संघटनेच्या विधायक उपक्रमांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद पोतदार यांनी केले.
या प्रसंगी डी राज सर्वगोड,कल्याण कुलकर्णी, रामकृष्ण बिडकर, दत्तात्रय पाटील, विनोद पोतदार, लखन साळुंखे, व्याख्याते व लेखक किरण निकम, कबीर देवकुळे, अमोल गुरव, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल माने तसेच मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र शाखा, पंढरपूरचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे पत्रकारांना पत्रकारितेतील कायदेशीर पैलूंची अधिक स्पष्ट माहिती मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
माझ्या अध्यापनाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न घडवता सुजाण नागरिक घडवण्याचे काम केले : तानाजी खंडागळे
माझ्या अध्यापनाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न घडवता सुजाण नागरिक घडवण्याचे काम केले : तानाजी खंडागळे
(श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रशालेत सेवानिवृत्ती पर सोहळा आयोजित)
वाट़बरे/प्रतिनिधी:
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेत मी जून 1992 ला रुजू झालो व 31 मे या प्रशालेतून 34 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालो. या प्रशालेचे संस्थापक कै. दा.सु.पवार सर यांनी या संस्थेत मला नोकरी दिली फक्त नोकरी दिली नाही तर माणसं दिली, नाती दिली तसेच मला खऱ्या अर्थाने घडवण्याचे काम पवार सरांनी केले .सेवानिवृत्ती पर आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते पुढे ते म्हणाले की मी अध्यापनाचे कार्य करताना इंग्रजी आणि राज्यशास्त्र या दोन विषयाचे अध्यापन केले इंग्रजीचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजीची असणारी भीती लक्षात घेता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इंग्रजी सोप्या पद्धतीने कसे शिकवता येईल व विद्यार्थ्यांना ते कसे समजेल हे मी पहिले तसेच राज्यशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकविला आज या प्रशालेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत याचा मला अभिमान वाटतो माझ्या नोकरीच्या कार्यकाळात सुखदुःखात कुटुंबातील सदस्य , माझे सहकारी व संस्था माझ्या पाठीमागे वेळोवेळी उभी राहिली त्यामुळे या सर्वांचा मी शेवटपर्यंत ऋणी राहीन .
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रशालेत गुरुवार दि. 2 जूलै रोजी शाळेचे सहशिक्षक तानाजी खंडागळे यांच्या सेवानिवृत्ती पर सोहळा आयोजित केला होता या वेळी यशवंत हायस्कूल शिरभावी चे सहशिक्षक शहाजी घाडगे रा .हातीद हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचाही यावेळी प्रशालेच्या वतीने सत्कार घेण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या वतीने तानाजी खंडागळे व त्यांच्या कुटुंबाचा शाल ,श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला तसेच शहाजी घाडगे यांचा ही प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यास प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक, तसेच तानाजी खंडागळे सरांचा मित्रपरिवार ,वाटंबरे ग्रामस्थ हतीद ग्रामस्थ तसेच प्रशालेतील माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत वाटंबरे ,विकास सेवा सोसायटी वाटंबरे तसेच गावातील विविध संस्थेचे चेअरमन तसेच विविध मान्यवरांनी शिक्षकांचा शाल ,फेटा ,श्रीफळ देऊन सत्कार केला .
यावेळी शाळेचे संस्थापक मोहन पवार सर, माजी विद्यार्थी, सरांचे सहशिक्षक तसेच त्यांचे मित्रपरिवार व नातेवाईकांनी आपल्या मनोगतातुन सरांच्या विविध पैलूंची माहिती देत सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पिंटू पवार सर यांनी केले.
बुधवार, १ जुलै, २०२६
सोलापूर जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद शाळांना इयत्ता पाचवीची मंजुरी. :- शिक्षण व आरोग्य सभापती श्री चेतनसिंह केदार सावंत
सोमवार, २९ जून, २०२६
भारत ज्ञानू पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
भारत ज्ञानू पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला (वाटंबरे )येथील भारत ज्ञानू पवार यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि 30 जून रोजी दुःखद निधन झाले. निधना समय त्यांचे वय 61 होते त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,चार मुली असा परिवार आहे.
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दि. 2 जुलै रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये सकाळी सात वाजून तिस मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांचे नातेवाईकांनी दिली.
🎤 KHABARDAR NEWS
✨ आवाज जनतेचा ✨
━━━━━━━━━━━━━━━
🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी
🟨 संपर्क: दत्तात्रय पवार
📞 मो:8007913668
मानेगाव येथे हृदयद्रावक घटना (मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू)
मानेगाव येथे हृदयद्रावक घटना
(मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू)
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ४२ वर्षीय असलम अब्दुल सय्यद यांचे निधन झाले. मुलाच्या अकाली जाण्याचा जबर मानसिक धक्का सहन न झाल्याने अवघ्या काही तासांत त्यांच्या ६७ वर्षीय आईचेही निधन झाले. त्यामुळे अवघ्या १२ तासांच्या अंतरात माय-लेकरावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर ओढवली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे असलम सय्यद यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या धक्क्याने मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच जन्मदात्या वृद्ध आईचेही हृदयविकाराच्या धक्क्यानेच निधन झाल्याने मानेगावात ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना रविवार, २८ जून रोजी मानेगाव ता. सांगोला येथे घडली.
असलम अब्दुल सय्यद (वय ४२) व अयुफा अब्दुल सय्यद (वय ६७) अशी मृत माय-लेकरांची नावे आहेत. मृत दोघांवर सायंकाळी स्थानिक कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रविवार, २८ जून, २०२६
आ. बाबासाहेब देशमुख यांची राजूरी येथे भेट.
जे







Social Media Icons